Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी २० फे-यामध्ये होणार

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी २० फे-यामध्ये होणार

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ विधानसभा मतदारसंघात १ लाख ५७ हजार १३  मतदान झाले आहे.आता मतमोजणी साठी प्रशासन स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. १४ टेबलवर ही मतदान मोजणी होणार असून एकूण २० फेऱ्या होणार आहेत. यासाठी २५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा.पासुन मतमोजणी सुरू होवून दुपारी १२ वा पर्यंत कुडाळ मालवण मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने तीन स्टेप मध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.अशी माहिती कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुसे यांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राजकीय स्तरावर विविध लोकप्रतिनिधी मतांची आकडेवारी करण्यात व्यस्त आहेत. तर प्रशासन मात्र निवडणुकीच्या निकालासाठी जय्यत तयारी करण्यात व्यस्त आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचा निकाल कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे होणार आहे. या अनुषंगाने तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे.

कुडाळ मतदार संघात एकूण २७९ मतदान केंद्र आहेत, यासाठी एकूण १४ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. एका फेरीत १४ केंद्रांची मतमोजणी होणार आहे. एकूण २० फेऱ्यात मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  निवडणूक मतमोजणी कालावधीमध्ये सुरक्षा यंत्रणा अतिशय कडेकोट ठेवण्यात येणार आहे. एकूण तीन स्टेप मध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या निवडणुकीचा दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी अभिमन्यू हॉटेल जवळचा परिसर व एस एन देसाई चौक या ठिकाणचा परिसर अशा दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे मात्र यांच अनुषगाने नुकत्याच कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पराडे यांनी याबाबत आढावा घेऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होणार नाहीत. तसेच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर असावे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान राजकीय पक्षांच्या मंडळींसाठी  दोन जागा निवडण्यात आल्या आहेत असे श्री. मगदूम यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!