Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हादेवगडअडीच वर्षांनी विषय समिती सभापती पदी भाजपची वर्णी ; देवगड जामसंडे नगरपंचायत...

अडीच वर्षांनी विषय समिती सभापती पदी भाजपची वर्णी ; देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती निवडणूक

देवगड | प्रतिनिधी

देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची व महिला बालकल्याण उपसभापती पदाची निवडणुक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाखाली भाजपने बाजी मारली असून बांधकाम समिती सभापती पदी गटनेते शरद ठुकरुल, पाणीपुरवठा व जल:निसारण समिती सभापतीपदी सौ प्रणाली माने ,स्वच्छता वैदयक आणि सार्वजनिक आरोग्य सभापती पदी सौ आद्या गुमास्ते, तसेच महिला बालकल्याण उपसभापती सौ रूचाली पाटकर यांची निवड झाल्याचे निवडणूक पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी जाहीर केले .

देवगड जामसंडे नगरपंचायतीची विषय समिती सभापती व महिला बालकल्याण उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी नगरपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय तथा पिठासन अधिकारी जगदीश कातकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे तसेच नगरपंचायत पदाधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका आदी उपस्थित होते.

बुधवारी नगरपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या विषय समिती सभापती निवडी भाजपाने बाजी मारली. बांधकाम सभापतीपदी भाजप नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल तर सदस्य पदी सौ तन्वी चांदोसकर निवृत्ती उर्फ व बुवा तारी,पाणीपुरवठा व जल:निसारण समिती सभापती पदी सौ प्रणाली माने तर सदस्य पदी सौ स्वरा कावले व संतोष तारी,स्वच्छता वैदयक आणि सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी आद्या गुमास्ते तर सदस्यपदी विशाल मांजरेकर मनीषा जामसंडेकर तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी सौ रूचाली पाटकर आदींची निवड करण्यात आली. दरम्यान महाविकास आघाडीचे गटनेते संतोष तारी यांनी नऊ नगरसेवकांना व्हीप जारी केला होता त्यामुळेही निवडणूक प्रक्रिया रंगतदार बनली होती.

अडीच वर्षाच्या राजकीय घडामोडीनंतर देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये भाजपचे विषय समिती सभापती विराजमान झाल्यानंतर भाजप नेते बाळा खडपे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर , संतोष किंजवडेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये,महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर, संजना आळवे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, संजय तारकर ,गणपत गावकर,मिलिंद माने, रवींद्र चिंदरकर सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!