Wednesday, August 5, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीभाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने परभणी येथील घटनेचा केला निषेध 

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने परभणी येथील घटनेचा केला निषेध 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील जगातील सर्वात मोठे असा गौरव केले जाणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या प्रतीची मंगळवारी १० डिसेंबर रोजी संध्याकाळी सोपान दत्तराव पवार या व्यक्तीने विटंबना केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभारत उमटत आहे. ही घटना निंदनीय आहे याचा आम्ही निषेध करत आहोत. या घटनेचा जलद गतीने तपास करून दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचेकडे निवेदन देऊन करणेत आली आहे.तसेच हा संविधानाचा केलेला अवमान आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा (भा. ज. पा.) च्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करणेत आला. यावेळी भा. ज. प. सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. नामदेव जाधव सिंधुदुर्ग भा ज प चे जिल्हा चिटणीस श्री. चंद्रकांत जाधव व अनुसूचित जाती मोर्चा चे सर्व जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!