कुडाळ शहरातील तीन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांचे छापे

0

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील तीन व्हिडिओ गेम पार्लरवर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली असून या व्हिडिओ गेम पार्लर मधील यंत्रसामुग्रीसह रोख रक्कम हस्तगत केली आहे.

कुडाळ शहरांमध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये पैसे देऊन सट्टा खेळला जातो अशी माहिती कुडाळ पोलिसांना मिळाल्यावर कुडाळ पोलिसांनी शहरातील तीन व्हिडिओ गेम पार्लरवर छापा टाकला यामध्ये व्हिडिओ गेम पार्लरमध्ये खेळत असताना काहीजण सट्टा लावून हा खेळ खेळत असल्याचे निदर्शनास आले यावर कुडाळ पोलिसांनी कारवाई केली आणि व्हिडिओ गेम पार्लरमधील मशीन तसेच खेळली जाणारी रोख रक्कम हस्तगत केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत उशिरापर्यंत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.