कुडाळ | प्रतिनिधी
दोडामार्ग बाजारपेठे ते तहसील कार्यालय या परिसरात फिरणाऱ्या एका वेडसर बेवारस महिलेला पणदूर येथील आनंद संस्था संचलित संविता आश्रमने आश्रय दिला आहे तिला या संस्थेने ताब्यात घेतले आहे.
दोडामार्ग बाजारपेठ ते तहसील कार्यालया परिसरात एक वेडसर बेवारस महिला गेली अनेक वर्ष फिरत होती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात दाखवणे बाजारपेठ मध्ये कोणाजवळही काही मागून खायची अशा स्थितीत ती आपला उदरनिर्वाह करत होती. याबाबत जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम यांना ही माहिती समजल्यावर त्यांनी या महिलेला या आश्रमामध्ये आश्रय दिला आहे. दोडामार्ग येथे आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले आहे. यावेळी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब, कार्यकर्ते प्रसाद आंगणे, केविन डिसोजा, प्रियांजली कदम, प्रांजल आंगणे, सोनाली साटम, प्रतीक्षा सावंत तसेच दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
