शक : १९४६, क्रोधी संवत्सर
अयन: उत्तरायण
ऋतू: सौर शिशिर ॠतू
मास : पौष
पक्ष : कृष्ण
तिथी : प्रतिपदा २७.२२ पर्यंत
नक्षत्र: पुनर्वसु १०.१७ पर्यंत
योग : विष्कंभ २६.५८ पर्यंत
करण : बालव १५.३५ पर्यंत
चंद्र राशी : कर्क
रवि राशी : ८.५५ नंतर मकर
सूर्योदय: सकाळी ७.१६
सूर्यास्त : सायंकाळी ६.२०
राहूकाल: १५.३४ ते १६.५७
आजचे दिनविशेष
आजचा दिवस आनंदी आहे.
अग्निवास संपूर्ण दिवस आहे.
शास्त्रार्थ :
१. रवि मकर ८.५५
२. मकरसंक्रांत : सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यावर पुण्यकाळाच्या दिवशी मकरसंक्रांत हा सण साजरा करतात. १४.१.२०२५ या दिवशी पुण्यकाल सकाळी ८.५५ पासून सायंकाळी ४.५५ मि. पर्यंत आहे. महाराष्ट्रात ‘मकरसंक्रांत’, तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’ आणि पंजाबमध्ये ‘लोहरी’ या नावाने हा सण प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात येणार्या या सणाला तिळासारख्या स्निग्ध पदार्थाच्या समवेत उष्णता निर्माण करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. संक्रांतीच्या दिवशी केलेले तीर्थस्नान आणि दान पुण्यकारक मानले आहे.
३. मकर संक्रांति २०२५ चे फल: मंगळवार १४ जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ८.५५ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. बालव करणावर संक्रमण होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाति असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारनांव आणि नाक्षत्रनांव महोदरी असून सामुदाय मुहूर्त ४५ आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पहात आहे.
४. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे? मकर संक्रांतीच्या दिवशी तिलमिश्रित उदकाने (पाण्याने) स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण आणि तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.
५. संक्रांतीच्या पर्वकाळात काय करु नये? संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष – गवत तोडणे, गाई – म्हशींची धार काढणे आणि कामविषय सेवन ही कामे करु नयेत.
६. संक्रांतिपर्वकालात स्त्रियांनी करावयाची दाने कोणती? संक्रांतिपर्वकालात स्त्रियांनी नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.
(संदर्भ : दाते पंचांग)
सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६
