कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरांमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिवा नायक याच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या असून शिवा नायक याची आत्महत्या नसून तो घातपात असल्याच्या दिशेने पोलीस यंत्रणा गेली असून याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे सुट्टीनंतर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर ही चक्रे फिरली आणि या आत्महत्येला वाचा फुटली.
कुडाळ बाजार पेठ येथे भाजी विक्री करणारा आणि त्याच ठिकाणी भाड्याने राहणारा शिवा नायक यांनी डिसेंबर महिन्यामध्ये आत्महत्या केली होती या आत्महत्येचे कारण उघडले नव्हते तसेच ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात होता दरम्यान शिवानायक याचा भाऊ याने कुडाळ पोलीस ठाणे तसेच पोलीस अधीक्षक यांच्याजवळ आपल्या भावाचा घात झाल्याचा संशय व्यक्त केला होता आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती दरम्यान या प्रकरणाची स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा तसेच कुडाळ पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने चौकशी सुरू करण्यात आली.
शिवा नायक यांच्या आत्महत्ये नंतर अनेक गोष्टींचा उलघडा झाला या प्रकरणात त्याच्या पत्नीची सुद्धा चौकशी करण्यात आली अशी प्राथमिक माहिती असून त्याच्या पत्नीने काही गोष्टी पोलिसांना सांगितल्या दरम्यान याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली असून गेल्या आठवड्यामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे सुट्टीवर गेले होते त्यामुळे या प्रकरणाचा तपास काहीसा थंडावला होता आता पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणाला गती आली आहे त्यामुळे या प्रकरणातील अनेक मासे पोलिसांच्या गळी लागल्या आहेत अशी खात्रीदायक माहिती मिळाली आहे.
