नांदगाव रेल्वे स्टेशन केले चकाचक

0

नांदगाव | प्रतिनिधी 

परदेशातील देशाप्रमाणे आपला देश स्वच्छ राहिला पाहीजे यासाठी प्रत्येक नागरीकांनी स्वच्छता राखली पाहीजे. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेचा गुण अंगीकारली तर स्वच्छतेच्या मोहिम राबवण्याची गरज राहणार नाही.मात्र स्वच्छता मिशन,सिंधुदुर्ग मार्फत होणारी स्वच्छता मोहीम व जनजागृती हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यानी सांगितले.रविवारी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग व नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना याच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर आणि समोरील रस्ता चकाचक करण्यात आला. या मोहिमेत सर्वगोड सहभागी झाले होते

स्वच्छता मोहिमेची सुरुवात राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, स्वच्छता मिशन,सिंधुदुर्गचे प्रमुख गणेश जेठे,मंडळ अधिकारी दिलीप पाटील,बँक ऑफ बडोदा कणकवली शाखा व्यवस्थापक नितेश शेनॉय,नांदगाव स्टेशन मास्तर श्री पोईपकर, ग्रामपंचायत अधिकारी पी.एन. नारकर, वाघेरी- मठखुर्द सरपंच अनुजा रावराणे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर,त्रिमूर्ती चालक मालक रिक्षा संघ नांदगाव रोड रेल्वे स्टेशन अध्यक्ष प्रदिप घावरे,उपाध्यक्ष सूर्यकांत पांचाळ, खजिनदार रवींद्र सावंत,सचिव गणेश गुरव,ज्येष्ठ सल्लागार सुभाष करमळकर, अनिल सुतार, मुरलीधर राणे, नितेश सुतार, सदाशिव सावंत, गणेश देसाई, रवींद्र घाडीगावकर, स्वच्छता ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर रोहित मोंडकर , पत्रकार मोहन पडवळ, प्रदिप राणे, उत्तम सावंत, गुरुप्रसाद सावंत,सचिन राणे, तुशार नेवरेकर,एम.बी.शेख,पोलीस पाटील अनंत राणे,दीपक रासम,विजय जामदार, प्रदीप फोपे,आनंद परब याच्यासह स्थानिक उपस्थित होते. 

पुढे बोलताना श्री. सर्वगोड म्हणाले, शारीराची स्वच्छता, परीसराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता यापैकी मन स्वच्छ असेल तर शरीर ,परिसर स्वच्छ आपोआप स्वच्छ होतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी स्वच्छ भारताचा नारा देत देश आर्थिक महासत्ता झाला पाहिजे यासाठी स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. स्वच्छता मिशन ने महामार्ग, रेल्वे येथे जाऊन स्वच्छता संदेश व स्वच्छता मोहिमा राबविल्या हे काम देश हिताचे असून त्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यानी स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचा स्वच्छता उपक्रम प्रेरणादायी असून आमचाही सहभाग यापुढे राहणार आहे. येत्या वर्षांत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात अशा प्रकारे येत्या काळात स्वच्छता मोहिम राबवू यात अधिकारी व कर्मचारी याचा सहभाग करून घेऊ असे सांगितले.तसेच शाखा व्यवस्थापक नितेश शेनॉय यानी स्वच्छता ही काळाची गरज असून स्वच्छता मिशनमध्ये सर्वानी सहभाग व्हावे असे सांगत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रदिप घावरे, अनुजा रावराणे, रविराज मोरजकर, दिलीप पाटील, पी.एन.नारकर यांनीमनोगत व्यक्त केले. नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, वाघेरी-मठखुर्द सरपंच अनूजा रावराणे यानी अल्पोपाहार व शाखा व्यवस्थापक नितेश शेनॉय यानी स्वच्छतेचे साहित्य पुरवून विशेष सहकार्य केले.