नायब तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांवर डंपर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनीष पावसकर याला पोलीस कोठडी 

0

 

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ नायब तहसीलदार व महसूलच्या कर्मचाऱ्यावर डंपर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पावशी येथील मनीष दिगंबर पावसकर याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता २३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पिंगुळी येथे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडण्यात आले होते यापैकी दोन डंपर चालकाने नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणातील पावशी येथील मनीष पावसकर हा पळाला होता त्याला कुडाळ पोलिसांनी पावशी येथे पकडले दरम्यान न्यायालयात हजर केले असता त्याला २३ जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.