३१ जानेवारी २०२५, शुक्रवार या दिवसाचे पंचांग

0

शक : १९४६, क्रोधी संवत्सर 

अयन: उत्तरायण

ऋतू: सौर शिशिर ॠतू 

मास : माघ

 पक्ष : शुक्ल 

तिथी : द्वितीया १४.०७ पर्यंत 

नक्षत्र: शततारका २८.१४ पर्यंत , 

योग : वरीयान १५.३२ पर्यंत 

करण : तैतिल २४.५० पर्यंत 

चंद्र राशी : कुंभ

रवि राशी : मकर 

सूर्योदय: सकाळी ७.१४

सूर्यास्त : सायंकाळी ६.३०

राहूकाल: ११.२८ ते १२.५२

आजचे दिनविशेष

आज दिवस शुभ आहे.

शास्त्रार्थ

 

१) धर्मबीज : माघ शुक्ल द्वितीया तिथीला ‘धर्मबीज’ असे म्हणतात; कारण या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथाला अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्या वेळी सर्व देवीदेवता उपस्थित होते. श्री गोरक्षनाथांनी ‘किमयागिरी’ या ग्रंथात लिहिले आहे, ‘जो कुणी धर्मबीज व्रत श्रद्धेने करील, त्यांच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी विघ्ने दूर होतील.’ ३१.१.२०२५ या दिवशी धर्मबीज आहे.

२) तृतीया श्राद्ध 

(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध) फोन नं. ९८२२६६७७५६