जीवाला जीव देणारे सहकारी मिळाले हे माझे भाग्य ; आमदार निलेश राणे

0

कुडाळ | प्रतिनिधी

मला जीवाला जीव देणारे सहकारी मिळाले हे माझे भाग्य आहे असे आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी गुढीपूर येथील महापुरुष कला क्रीडा संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या वेळी सांगून या गुढीपुरातील जनतेने आम्हाला भरभरून दिले आहे कोणत्याही निवडणुकीमध्ये त्यांनी आमची साथ सोडलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत मी कायम राहणार आणि तुमचे प्रश्न सोडवणार असे त्यांनी यावेळी सांगितले.

पिंगुळी गुढीपूर येथील महापुरुष कला क्रीडा संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला आमदार निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगरसेवक श्री पाटकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की तुमचा जो जात पडताळणीचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी जो अधिकारी बसला आहे त्याची पावर काही दिवसात काढून टाकू आणि तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू उपसरपंच सागर रणसिंग यांनी हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला आहे विविध सामाजिक कार्यक्रम सुद्धा त्यांच्या माध्यमातून होत आहेत त्यांची साथ आम्हाला कायम मिळत आहे अशीच साथ आम्हाला मिळत राहो आणि आमच्या हातून तुमची कामे होत राहो अशा शब्दात त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

कधीतरी माझा सुद्धा स्ट्रोक पहा

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की मला सुद्धा क्रिकेटची आवड आहे कधीतरी आम्हाला सुद्धा मैदानात बोलवा मग आमचे सुद्धा काही स्ट्रोक आहे ते दाखवू असे सांगितले दरम्यान आयोजकांनी त्यांना खेळण्याची विनंती केली तेव्हा आमदार निलेश राणे यांनी आपले क्रिकेट मधील स्ट्रोक दाखवले आणि सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला.