सबसे अलग आमदार निलेश राणे यांची झलक

0

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी जे जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले या त्यांच्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.। सबसे अलग आमदार निलेश राणे यांची झलक असंच या निमित्ताने म्हणावं लागेल

एक व्हीजन असलेला नेता म्हणून निलेश राणे यांच्याकडे पाहिले जाते आपला मतदारसंघ नाविन्यपूर्ण करणार ही आस घेऊन निलेश राणे आमदार झाल्यावर कामाला लागले नुसते कामाला लागले नाही तर त्यांनी शासकीय कार्यालयात जाऊन त्या त्या कार्यालयाच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन कुठे काय कमी आहे कुठे काय पाहिजे याचा सगळा अभ्यास केला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सज्ज झाले आमदार झाल्यानंतर पहिल्या आपल्या नागपूरच्या अधिवेशनातही त्यांनी आपल्या कार्यकर्तुकुपाची झलक दाखवली होती त्याहीपेक्षा आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही निलेश राणे यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून सर्वांचेच लक्ष वेडले मळलेल्या वाटेने न जाता म्हणजेच आपलं सरकार आहे आपल्या सरकार बद्दल बोलायचं कसं हे न बघता त्यांनी जे वास्तव आहे ते मांडले या त्यांच्या मांडणीतून विरोधकांनाही मुद्दे मिळाले नाहीत विरोधकांनाही त्यांनी गर्भगळीत केले सरकारलाही आत्मपरीक्षण करायला लावले

निलेश राणे यांनी मांडलेले मुद्दे कदाचित सत्तेतील नेत्यांना कटू वाटले असतील पण या मुद्द्याचा कधी ना कधी कुठल्याही सरकारला विचार करावा लागेल आपण विकासाच्या सरकार म्हणून गप्पा खूप मारतो पण विकास करताना त्याला निधी दिला जातो का वर्षानुवर्षे निधी दिला जात नसल्याने कामे रखडत आहेत महामार्ग कित्येक वर्ष रखडला आहे त्यामुळे त्याचा परिणाम विकासावर होत आहेत आज आमदार खासदार आपापल्या सदनात प्रश्न उपस्थित करतात आणि मतदारसंघात येतात मात्र मतदारसंघात आल्यावर कार्यकर्ते निधीची अपेक्षा करतात मग आमदार खासदार आणि त्यांना काय सांगावे हीच वेदना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी अर्थसंकल्पीय सदनात मांडून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आमदार निलेश राणे यांच्या कामकाजाची जोरदार चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत असून “सबसे अलग आमदार निलेश राणे यांची झलक” हीच टॅग लाईन आता सर्वत्र चर्चिली जात आहे

 

       सुसाट टीम सिंधुदुर्ग