रमजान ईद दिनाच्या अनुषंगाने जिव्हाळा सेवाश्रमाला देण्यात आले जीवनावस्थेत वस्तू…

0

रमजान ईद दिनाच्या अनुषंगाने जिव्हाळा सेवाश्रमाला देण्यात आले जीवनावस्थेत वस्तू

 

कुडाळ प्रतिनिधी

रमजान ईद दिनाच्या अनुषंगाने श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित माडयाचीवाडी रायवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमाला मरकज-उल-फलाह संस्थेमधील विश्वस्त व त्यांचे सहकारी यांनी आश्रमातील लाभार्थ्यांची भेट घेऊन आश्रमात विविध जीवनावश्यक वस्तू आणि फळांचा पुरवठा करण्यात आला.

 

संस्थेच्यावतीने गीतांजली बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि सिंधुदुर्ग मरकज-उल-फलाह संस्थेचे त्यांनी केलेल्या दातृत्वाबद्दल आभार मानले.

 

समाजातील निराधार अंध, अपंग, यांना सहाय्य करणेचा मरकज-उल-फलाह, सिंधुदुर्ग संस्थेचा मानस खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. मरकज-उल-फलाह या सेवाभावी संस्थेद्वारे, सामाजिक बांधिलकी जपत केल्या जाणारे विविध उपक्रम आदर्शवत आहेत. धार्मिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते.

 

यावेळी श्री. एजाज नाईक यांनी यापुढे देखील जिव्हाळा सेवाश्रम आश्रमास सहकार्य करून जवाबदारी निभावण्याची हमी दिली. मरकज-उल-फलाह या संस्थे चे संचालक हाफिज नाझिम यांनी जिव्हाळा सेवाश्रमाच्या कार्याची प्रशंसा केली.

 

यावेळी कुडाळ चे माजी नगरसेवक श्री. एजाज नाईक, हाफिज जहेज शेख, श्री. वसीम खान, श्री. मुबीन दोस्ती, श्री. अनिक नाईक आदी उपस्थित होते.