*बीड लॉबीने जिल्ह्याच्या सुरक्षेचे चक्रव्यूह भेदले ..माजी आम. वैभव नाईक यांच्या आरोपामुळे सुरक्षेच्या आणि गोपनीय विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह*
सिंधुदुर्ग 14
ठाकरे सेनेचे माजी आम. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी दौऱ्यावर आले तेव्हा त्यांचे हेलिपॅड वर दोघा महसूल कर्मचाऱ्यांकडून स्वागत करतानाचे व्हिडिओ तात्काळ व्हायरल करून सुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कोणीही यावे आणि टिकली मारून जावे असाच प्रकार जिल्ह्यात चालला आहे का यावर नियंत्रण नाही का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत राजशिष्टाचार( प्रोटोकॉल) मोडून हे दोघे काटेकोर सुरक्षा व्यवस्था असताना मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोहचले कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे या बीड लॉबीने सुरक्षेचे चक्रव्यूह भेदले आणि व्हीव्हीआयपी व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे गुप्तता गोपनीयता राहिली कुठे असा सवाल या निमित्ताने पुढे येत आहे मुख्यमंत्र्यांचे स्वागत आम आदमी सुद्धा करू शकतो मात्र त्याला काही प्रोटोकॉल्स आहे मुख्यमंत्री दौरा असताना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत एन्ट्री पास दिले जातात त्यांच्या परवानगीने ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील त्या त्या ठिकाणी पास दिले जातात हे पास देताना अगदी डोळ्यात तेल घालून पास देण्यात येतात असे दाखवले जाते असा देखावा केला जातो की काय हे या आरोपावरून निर्माण झालेला प्रश्न आहे एखाद्या मुख्यमंत्र्यांसारख्या महननीय व्यक्तीच्या दौऱ्यात पत्रकारांना मोजकेच पास दिले जाते दिले जातात एक पासदेऊन पत्रकारांची बोळवण केली जाते जिल्हा माहिती कार्यालयामार्फत एकच पास दिला जाईल असा दंडकघातला जातो.. पास न मिळालेले पत्रकार याबाबत विचारणा करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते तरीसुद्धा एका पासवर पत्रकार वृत्तसंकलन करतात प्रशासनाशी भांडत नाहीत मात्र मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी सुरक्षा कडे तोडून आलेल्या दोन व्यक्ती आणि माजी आम. वैभव नाईक यांनी केलेला गंभीर आरोप लक्षात घेता या दोघा व्यक्तीकडे हेलिपॅड वर जाण्यासाठी पास होते का हाही प्रश्न दुर्लक्ष करून चालणार नाही पास त्यांच्याकडे असतील तर ते कोणत्या आधारे त्याना देण्यात आले याचे स्पष्टीकरण प्रशासनाने करणे महत्त्वाचे आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी राजकीय दृष्ट्या जरी आरोप केले असले तरी त्यांचा हा आरोप दुर्लक्षुन मुळीच चालणार नाही त्यांनी केलेल्या आरोपामुळे प्रशासनाच्या जिल्हा प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही सुरक्षा यंत्रणा फोलठरल्याचे वैभव नाईक यांनी दाखवून दिले आणि पालकमंत्री नितेश राणे त्यांच्यातील ढीलाईपणा पुढे आणला असे आता बोलले जात आहे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहेपालकमंत्री नितेश राणे यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एका पत्रकार परिषदेत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बीडलॉबी बाबत वक्तव्य करून बंदोबस्त करण्याचे सुतोवाच केले होते मात्र याच बीड लॉबीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नितेश राणे यांच्या वक्तव्याला ही सुरुंग लावल्याची चर्चा आता जोरदारपणे जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे पालकमंत्र्यांना डॅमेज कंट्रोल करण्याचाही हा प्रकार असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
दोघांवर निलंबनाची कारवाई करून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यानानोटीस काढून मलमपट्टी करण्याचा प्रकार प्रशासनाने केला असला तरी सदोष सुरक्षा यंत्रणे बाबत प्रशासन काय करणार याचाही खुलासा आम जनतेला देणे गरजेचे आहे टाईट सिक्युरिटी असल्याचे भासवुन या टाईट सिक्युरिटी चे चक्रव्यूह भेदून हे दोघे आत शिरले कसे याची चौकशी होणे गरजेचे आहे या प्रकाराला संबंधित कोण कोण जबाबदार आहे याबाबतही कारवाई होईल का असा सवाल आता विचारला जात आहे आमजनतेला कडकसुरक्षिततेचा धाक दाखवायचा आणि सत्तारूढ पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या स्वागत करण्यापासून हेलिपॅड वर रोखायचे आणिआपली सुरक्षा कडकअसल्याचे भासवायचे देखावा करायचा हेदोघा कर्मचाऱ्यांनी ताफ्यात घुसून कडक सिक्युरिटी चे तीन तेरा वाजवले मग कोणीही यावे टिकली मारून जावे अशा प्रकारामुळेच अशा घटना घडत आहेत देशाचे नेते शरद पवार यांचं वाक्य नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेला येत
ते सांगतात प्रशासन समजणे अवघड आहे त्यामुळेपालकमंत्री नितेश राणे यानाही प्रशासन खूप समजून घ्यावे लागेल.. या प्रकारामुळे तर ते अधोरेखितच झाले.. तत्कालीन पालकमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपल्या 25 ते 30 वर्षाच्या कारकीर्दीत प्रशासनावर एक वचक ठेवला होता मात्र असावाचक त्यानंतर मात्र दिसून आला नाही येत नाही असं म्हणावं लागेल कडक सुरक्षा असताना विरोधकांपर्यंत व्हिडिओ क्लिप जाते यावरूनच सुरक्षा यंत्रणेची ढिलाई आणि गुप्तता विभागाची कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
मालवण बोर्डिंग ग्राउंड वर पास असुनही भाजपच्या पदाधिकाऱ्याना मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ दिले नाही असे समजते. या दोघानी पोलिसांच्या या कृतीवर नापसंती व्यक्त केली.सुरक्षा कारण लक्षात घेऊन हा विषय त्यानीवाढवला नाही.. त्यामुळे मालवण आणि करंजे येथील कार्यक्रम स्थळाच्या हेलिपॅडवर
कोणी कोणी जायचे हे ठरले होते का..? त्याप्रमाणे पोलीस सुरक्षा पासेस कोणाला देण्यात आले? त्याची यादी कोणी तयार केली..? त्याला कोणी मान्यता दिली अप्रोहल केली त्यात राजशिष्टाचार मोडून घुसखोरी करणाऱ्या या दोघा कर्मचाऱ्यांची ही नावे होती कां..? दोघांकडे पास नव्हते तर मग त्यांना कोणी हटकले कां नाही. मुख्यमंत्र्याना शाल घालेपर्यंत कोणाच्याच कसे लक्षात आले नाही.
कंठाळे आणि हांगे हे सुरक्षा व्यवस्था तोडून पुढे जातात. मुख्यमंत्र्यांना शाल घालून पुष्पगुच्छ देतात. विशेष म्हणजे याच व्हिडिओ शूटिंग कोणी केलं? मोबाईल वर की कॅमेरा द्वारे..? शूटिंग करणारा कोण..? त्याच्याकडे पास होता कां..? त्यांनी सोबत आणला होता का..? माहिती कार्यालय, सरकारी, पोलीस , महसूल, आयोजकाचा कॅमेरामन होता कां..? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे त्याही पलीकडे याची क्लिप बाहेर कशी गेली..? या सर्वांची चौकशी होऊन नेमका प्रकार आम जनतेसमोर आला पाहिजे नाहीतर कोणीही यावे टिकली मारून जावे.. अशा पद्धतीने प्रशासनातील कामकाज समांतर पद्धतीने चालत असेल तर पालकमंत्र्यानाही ते आव्हान ठरू शकते या दोघा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असला तरी.. यामागील सूत्र समोर येणे सुरक्षा आणि गोपनीयतेच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे आहे.
|र|वी|गा|व|डे|
