नेरूर जकात जवळ ट्रान्सफार्मरवर काम करणाऱ्या कंत्राटी वायरमन वैभव ठाकूर हा विजेचा धक्का लागून गंभीर जखमी..

कुडाळ | प्रतिनिधी

नेरूर जकात जवळ ट्रान्सफार्मरवर काम करणाऱ्या कंत्राटी वायरमन वैभव ठाकूर (रा. नेरूर ठाकूरवाडी, वय ३०) याला विजेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळे येथे दाखल करण्यात आले आहे.

नेरूर जकात जवळील ट्रान्सफार्मरवर काम करण्यासाठी आज (गुरुवारी) दुपारी कंत्राटी कर्मचारी वैभव ठाकूर चढला होता. दरम्यान या विद्युत तारांना शॉक आला हा शॉक वैभव ठाकूर यांच्या हाताला आणि पायाला लागला तो जमिनीवर कोसळला त्याला तात्काळ उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे आणले मात्र अधिक उपचारासाठी गोवा बांबोळे येथे पाठवण्यात आले ही घटना समजल्यावर नेरूर येथील ग्रामस्थांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव घातला या कंत्राटी कामगाराला कंत्राटदाराने उपचारासाठी योग्य तो मोबदला दिला पाहिजे तसेच त्याच्यावर उपचार होईपर्यंत त्याचा पगार सुरू ठेवला पाहिजे अशी मागणी केली यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सांगितले कंत्राटदारांने या मागण्या मान्य केल्या.