कुडाळ नगरपंचायतीच्या नियोजित विकास आराखड्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले..

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ नगरपंचायतीचा पीएलयू म्हणजे नियोजित भूखंड वापर प्रारूप विकास आराखडा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला मात्र हा आराखडा नगरपंचायतीने न स्वीकारता तो आराखडा पुन्हा तयार करून सभेसमोर सादर करण्यासंदर्भात ठराव घेतला. हा आराखडा नगररचना विभागाकडून मुदती पूर्वी दोन दिवसा अगोदर हा आराखडा आणल्यामुळे तो नाकारण्यात आला.

कुडाळ नगरपंचायतीच्या नियोजित विकास आराखड्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. या विकास आराखड्यामध्ये कोणती आरक्षण कोठे पडली आहे. याकडे नागरिकांचे लक्ष आहे. सन २०२२ मध्ये हा आराखडा बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी दोन वर्षाची मुदत होती. दरम्यान या कालावधीमध्ये अस्तित्वातील जमीन वापर हा नकाशा बनविण्यात आला आणि तो प्रसिद्ध करण्यात आला दरम्यान नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर नगरपंचायतीमध्ये येऊन या आराखड्यावर हरकती घेण्याच्या सूचना केल्या त्यामुळे सुमारे सहाशे हरकती दाखल झाल्या त्यानंतर या आराखड्यावर हरकती घेतले जात नाही हे सांगण्यात आले. दरम्यान इएलयु म्हणजे नियोजित भूखंड वापर या आराखड्यासाठी मुदत वाढ देण्यात आली. २०२४ नंतर हा आराखडा २०२५ मध्ये नगररचना विभागाने कुडाळ नगरपंचायतीला सादर करणे गरजेचे होते.

दरम्यान हा आराखडा तयार करण्याची मुदत ३ मे पर्यंत होती आणि हा आराखडा मान्य करून तो लोकांसाठी प्रसिद्ध करण्यासाठी नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आवश्यक होती. या सभेमध्ये हा आराखडा आणि नकाशा प्रसिद्ध करून नागरिकांसाठी खुला केला जाणार होता. दरम्यान नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी कोणतीही मुदत न देता हा आराखडा प्रसिद्ध करण्यासाठी सीलबंद बॉक्समधून ३० एप्रिल रोजी नगरपंचायत कार्यालयात आणले आणि तात्काळ नगरसेवकांची बैठक घेऊन हा आराखडा मंजूर करून नकाशा प्रसिद्ध करण्याबाबत सांगितले. त्यावेळी यावर हरकत घेऊन नगरपंचायतीची सभा घेण्यासाठी अवधी लागतो. दोन दिवसांमध्ये सभा घेणे शक्य होणार नाही. यासंदर्भात पुढील सर्वसाधारण सभेमध्ये विचार विनिमय केला जाईल असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.

कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) झाली. या सभेमध्ये हा विषय घेण्यात आला यावेळी नगर रचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या निदर्शनास त्यांनी केलेली चूक आणि केलेला विलंब आणून दिला यासंदर्भात सर्व नगरसेवकांनी एकमत करून हा विकास आराखडा पुन्हा तयार करण्यासाठी सहा महिन्याची मुदत नगररचना विभागाला दिली यावेळी मुख्याधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हा नकाशा आता स्वीकारला तर तो मुदतीनंतर स्वीकारला सारखे होईल आणि या संदर्भातील सर्व अधिकार नगर रचना अधिकाऱ्यांना जातील जर हे अधिकार आपल्याजवळ ठेवायचे असतील तर मुदत वाढ घेणे गरजेचे आहे या संदर्भात सर्व नगरसेवकांनी एकमत करून या विकासाराखड्याला सहा महिन्याची मुदत वाढ दिली तसा ठराव करण्यात आला. त्यामुळे कुडाळ शहर विकास आराखडा सहा महिन्यानंतर नागरिकांसाठी खुला होणार आहे.