प्रसिद्ध श्री देव खापरा जत्रोत्सव २५ व २६ मे रोजी

कुडाळ | प्रतिनिधी

तालुक्यातील नारूर येथील श्री देव खापरा जत्रोत्सव २५ मे व २६ मे रोजी संपन्न होणार आहे. हा जत्रोत्सव पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा कर्नाटक कोल्हापूर या परिसरातून मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात.

कुडाळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेला नारूर येथील श्री देव खापरा जत्रोत्सव यावर्षी होणार आहे २५ मे रोजी रात्री १० वा. तर २६ मे रोजी दुपारी १ वा. व रात्री १० वा. होणार आहे. तसेच २६ मे रोजी दुपारी बारा पासून महाप्रसाद असणार आहे तरी भाविकांनी या जत्रोत्सवाला उपस्थित राहावे श्रीदेवी महालक्ष्मी देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.