घोटगे भरणी आगरवाडी येथील राजेश नामदेव परब हे १४ मे पासून बेपत्ता..

कुडाळ | प्रतिनिधी 

घोटगे भरणी आगरवाडी येथील राजेश नामदेव परब (वय ४९) हे १४ मे पासून बेपत्ता आहेत. याबाबत त्यांची पत्नी राजेश्री राजेश परब हिने पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. 

घोटगे भरणी आगरवाडी येथील राजेश परब यांनी पावसाळी शेतीसाठी आवश्यक असणारे खत आपल्या मुला सोबत बाजारातून आणले आणि हे खत आपल्या शेतावर ठेवले त्यानंतर त्या मुलाला सांगितले की तू घरी जा आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले ते पुन्हा घरी आले नाहीत. त्यांची शोधाशोध केली असता ते सापडून आले नाहीत. त्यामुळे त्यांची पत्नी राजेश्री राजेश परब हिने पोलीस ठाण्यात आपले पती बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे.