कुडाळ | प्रतिनिधी
गोठोस भीतीयेवाडी (देऊळवाडी) येथील सौ शुभांगी संतोष सावंत (वय ३३) यांनी काजूच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत तिचे पती संतोष वसंत सावंत यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
संतोष सावंत यांनी दिलेल्या खबर मध्ये असे म्हटले आहे की त्यांची पत्नी सौ शुभांगी सावंत हिने राहत्या घराच्या बाजूला असलेल्या काजूच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.
