Tuesday, November 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळपहेलगाम मध्ये घडलेल्या आतंकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने आपल्या शौर्याचे प्रमाण देत...

पहेलगाम मध्ये घडलेल्या आतंकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने आपल्या शौर्याचे प्रमाण देत “ऑपरेशन सिंदूर” यशस्वी पार पाडले त्या निमित्त कुडाळ येथील सकल राष्ट्रप्रेमी नागरिकांच्यावतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली.

कुडाळ | प्रतिनिधी

 

पहेलगाम मध्ये घडलेल्या आतंकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने आपल्या शौर्याचे प्रमाण देत “ऑपरेशन सिंदूर” यशस्वी पार पाडले त्या निमित्त कुडाळ येथील सकल राष्ट्रप्रेमी नागरिकांच्यावतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली.

ये नया भारत है घर मे घुसेगा भी और मारेगा भी या उक्ती प्रमाणे भारताचे कणखर नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दलाचे आधुनिकीकरण केले आहे ज्या पद्धतीने त्यांचे अधिकार आणि दहशतवादाविरोधी कारवाई करण्याची खुली सूट दिलेली आहे. त्यामुळे आपलं सैन्य दल किती प्रगत आहे याची कल्पना पूर्ण जगाला आलेली आहे ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दलाने १०० पेक्षा जास्त आतंकवाद्यांना मारून दहशतवाद्यांची ठिकाणे नाहीशी करून पाकिस्तान चा खरा चेहरा जगासमोर उघडा करून पहेलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे त्या बद्दल सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी कुडाळमध्ये आज देश प्रेमी नागरिकांच्या वतीने “तिरंगा यात्रा” करण्यात आली.

ही यात्रा राजमाता जिजाऊ चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी काढण्यात आली या यात्रेत सौ अदिती सावंत, सौ आरती पाटील, सौ संध्या तेरसे, सौ विशाखा कुलकर्णी, सौ प्रज्ञा राणे, माजी नगराध्यक्ष सौ आफरीन करोल, माजी नगराध्यक्ष सौ अक्षता खटावकर, सौ श्रेया गवंडे, सौ सायली जळवी, सौ मुक्ती परब, सौ तेजस्विनी वैद्य, सौ चैत्राली पाटील, सौ अंजली वालावलकर सौ अंजली मुतालिक, कुमारी आस्था सावंत, सौ अक्षता कुडाळकर, 

श्री रमा नाईक, बंड्या सावंत, संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, डॉक्टर अभय सावंत, वैद्य सुविनय दामले, द्वारकानाथ घुर्ये, श्री बबन घुर्ये, प्रसाद शिरसाठ, निलेश परब, राजू बक्षी, प्रख्यात काणेकर, भोलानाथ कोचरे, के एल फाटक, संजय भोगटे, स्वरूप वाळके, अविनाश पाटील अन्वय मुतालिक, विवेक मुतालिक, चंदू पटेल, जयंती पटेल, जयवंत बिडये, राजू पाटणकर, भाई म्हापनकर, समीर सावंत, अनंत गावकर, रमेश राणे, उदय आहेर , विवेक बोभाटे, काशिनाथ निकम, सडवेलकर व देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!