*नारूर येथील प्रसिद्ध श्री देव खापर जत्रोत्सव झाला संपन्न…. भाविकांची अलोट गर्दीमध्ये झाला जत्रोत्सव संपन्न …*
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक, कोल्हापूर या ठिकाणाहून भक्तांची उसळली गर्दी
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील नारूर येथील प्रसिद्ध श्री देव खापरा जत्रोत्सव भक्तांच्या अलोट गर्दी मध्ये साजरा झाला हा उत्सव पाहण्यासाठी गोवा कर्नाटक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो भाविक आले होते.
नारू येथील प्रसिद्ध श्री देव खापरा जत्रोत्सव एक वर्ष आड करून साजरा केला जातो या जत्रोत्सवाची वाट अनेक भक्तगण पाहत असतात यावर्षी जत्रोत्सव २५ व २६ मे रोजी संपन्न झाला श्री देव खापरा याचे दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या वीरांना शोधण्यासाठी भिरभिरणारी नजर त्याच्या मागवून हजारो भाविक उच्छा…. उई…. ची अशी आरोळी देत देवासोबत धावणारे भाविक पाहण्यासाठी हजारो भक्त गण येतात आज जत्रोत्सव आज २६ मे रोजी संपन्न झाला या जगोत्सवासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती यावर्षी श्री देव महालक्ष्मी देवस्थान तसेच श्रीदेव खापरा भक्तगण यांच्याकडून पहिल्यांदाच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
