कुडाळ | प्रतिनिधी
पावसाळी हंगामात सतर्क रहा आणि गावागावातून नागरिकांचे येणारे फोन उचला असं असे सक्त आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांना कुडाळ चे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठकीत दिले येथील तहसील कार्यालयात सोमवारी सायंकाळी ही बैठक झाली
बैठकीस उपस्थित सरपंच, पोलीस पाटील यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य आपत्ती विषयक अहवाल नादुरुस्त पूल, पाणी साचणेची ठिकाणे, पडलेली झाडे, रस्त्यांना खड्डे, बॉक्सेल च्या ठिकाणी साचणारे पाणी, राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळे नागरीकांच्या घरे बागायतीमध्ये घुसणारे पाणी इ. अहवाल या कार्यालयाकडे सादर कलेले होते. त्यानुषंगानेही चर्चा करुन तातडीने उपाययोजना करणेबाबतच्या सूचना संबंधित विभागांना देणेत आल्या
संबंधित अधिका-यांचा व्हॉटसअप ग्रुप तयार केलेला आहे त्यावर येणा-या आपत्तीविषयक सुचनांवर ताबडतोब प्रतिसाद देणे आवश्यक आहे. सर्व संबंधीत कार्यालयांनी, पोलीस पाटील, सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी वांनी आपत्ती दरम्यान सतर्क रहाणेचे आहे. अधिकारी कर्मचारी यांनी फोन चालू ठेवणे आवश्यक आहे. नापत्तीचे वेळी संपर्क न झालेने नुकसान झालेस संबंधितांवर नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 51 नुसार गुन्हा दाखल करणेची कारवाई करणेत येईल असे सांगून याबाबतच्या तरतुदीचे वाचनही करणेत आले.
संभाव्य आपत्ती प्रवण क्षेत्रातील नागरिकांना संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी यांचेमार्फत स्थलांतर करणेबाबतच्या नोटीसा देणेत आलेल्या आहेत. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे या भावनेने सर्व विभागांनी समन्वय राखून कार्यवाही करावी असे सांगण्यात आल्याची माहिती तहसीलदार वसावे यांनी दिली
बैठकीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपअभियंता धीरज कुमार पिसाळ वन अधिकारी संदीप कुंभार सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर तसेच विविध खात्याचे विभागप्रमुख कर्मचारी उपस्थित होते
