Saturday, November 8, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील शेतकरी बांधवांना मागेल त्या...

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील शेतकरी बांधवांना मागेल त्या जातीचे व कंपनीचे मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले..

कुडाळ | प्रतिनिधी

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील शेतकरी बांधवांना मागेल त्या जातीचे व कंपनीचे मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले सदरील कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच रामचंद्र परब यांच्या हस्ते करण्यात आले. 

             तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत तर्फे सलग सात वर्षे गावातील शेतकरी बांधवांना मागेल त्या जातीचे व कंपनीचे मोफत भात बियाणे उपलब्ध करून देण्यात येते त्याच प्रमाणे याही वर्षी सातत्याने हा उपक्रम राबविल्याने गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाची बाब दिसून आली या आठव्या वर्षी गावातील शेतकरी बांधवाना एक टन दोनशे किलो भात बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले जेणेकरून शेतकरी बांधवांच्या भात शेती उत्पादनामध्ये वाढ होईल ग्रामपंचायत मार्फत ज्या शेतकरी बांधवानी हे मोफत बियाणे घेतले त्यांच्या शेतातून ते तीस टन पेक्षा जास्त उत्पादन घेणार हे निश्चित दिसून येते आज नैसर्गिक किंवा अन्य मार्गातून जे नुकसान होत आहे त्यात मोफत भात बियाणे देऊन ग्रामपंचायतने शेतकऱ्यांसाठी केलेल्या या कार्यासाठी तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत चे सर्वत्र कौतुक होत आहे.

               या मोफत भात बियाणे वाटप कार्यक्रमाच्या वेळी भा. यु. मोर्चा ता. अध्यक्ष श्री रुपेश कानडे,उपसरपंच सौ. रोहिणी हळदणकर, ग्रा. सदस्य श्री महेंद्र मेस्त्री, श्री गुणाजी जाधव, श्री अजय डिचोलकर, श्री संतोष डिचोलकर सौ. प्रणाली साटेलकर, सौ. माधवी कानडे, सौ.धनश्री गवस, ग्रामविकास अधिकारी श्री भूषण बालम, ग्रामस्थ श्री. रमेश परब, श्री. सूर्यकांत कानडे, श्री. तुकाराम माणगांवकर, श्री. शिवानंद दाबोलकर, श्री. संजय कोरगावकर, श्री. गणपत डिचोलकर, श्री. रामजी साटेलकर आदी ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!