कुडाळ शहरातील एका दुकानातील लॉकरची चावी शोधून लॉकर उघडून आतील रक्कम चोरताना चोरटा सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला

कुडाळ / प्रतिनिधी

कुडाळ शहरातील एका दुकानातील लॉकरची चावी शोधून लॉकर उघडून आतील रक्कम चोरताना चोरटा सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे गेल्या पाच सहा दिवसा पूर्वीही घटणा घडली आहे मात्र दुकानदरांने याबाबत पोलीसात तक्रर देण्यास नकार दिल्याने सबंधीत चोरट्यावर कारवाई होऊ शकली नाही मात्र पोलीसांनी यांची दखल घेत पोलीस डायरीत नोद घेतली सदर व्यक्ती भुरटा चोर असल्याची चर्चा आहे कुडाळ तालुक्यातीलच तो रहीवाशी आहे

दुकानाच्या काऊंटरवर व दुकानात कोणी नाही हे पाहून चोरटा भर दिवसा दुकानात शिरला त्यानंतर दुकानात कोणी येत नाही याची खात्री करीत दुकानाच्या काऊंटरवरील टेबलचा ड्राव्हर उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला लॉक असल्याने त्याने लगतचा ड्रावर उघडून चावी शोधण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या प्रयत्नात त्याला चावी सापडली त्यानंतर पुन्हा कोणी येत नाही याची खात्री केली याच दरम्यान बाहेर कोणीतरी आल्याने त्याने चावी तिथेच बाजूला ठेवली त्या नंतर तो त्यांच्याशी बोललाही असे दिसून येत आहे मात्र बाहेर आलेली व्यक्ती बाजूला गेल्यावर त्याने चावी घेत पैसे असलेला ड्रावर उघडला वाकून आतील काही रक्कम काढली कुलूप केले व त्यानंतर ती चावी त्याच जागी ठेवत काढलेले पैसे खिशात घालून निघून गेल्याचे सीसी टीव्हीत कैद झाले आहे