देवगड शिवनगर येथील कु. कादंबरी मंगेश बापर्डेकर (16) हिचे बुधवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.
कु. कादंबरी ही उमा मिलिंद पवार इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थिनी असून ती नुकतीच दहावीची परीक्षाही उत्तीर्ण झाली होती. गेले काही दिवस ती आजारी होती. तिच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरु होते. मात्र बुधवारी तिची प्राणज्योत मालवली . पार्थिवावर दुपारी देवगड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पच्छात आई वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. देवगड एसटी विभागाचे सेवानिवृत्त वाहक व देवगड फ्रेंड्स सर्कलचे सदस्य मंगेश बापर्डेकर यांची ती कन्या होती.
