कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ एमआयडीसीसाठी आवश्यक असणारे विद्युत उपकेंद्र व भुयारी विद्युत वाहिनी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित एमआयडीसी असोसिएशनच्या बैठकी सांगितले तसेच ही एमआयडीसी अजून कशी विकसित होईल यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी केले.
कुडाळ एमआयडीसी साठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पॅकेज जाहीर केले होते या पॅकेजच्या अनुषंगाने एमआयडीसीमध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ज्यामुळे एमआयडीसी विकसित होऊ शकते यासंदर्भात आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसी असोसिएशन सोबत आज (शुक्रवारी) एमआयडीसी विश्रामगृह येथे बैठक घेतली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेता संजय आंग्रे, दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी नगराध्यक्ष विनायक राणे तसेच एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उपाध्यक्ष डॉ नितीन पावसकर, कार्यवाह एड. नकुल पार्सेकर, सहकार्यवाह कुणाल वरसकर, खजिनदार उदय शिरोडकर, सदस्य आनंद बादीवडेकर, अमित वळंजू, राजन नाईक, विशेष निमंत्रित सदस्य मुश्ताक शेख, प्रमोद भोगटे, सल्लागार शशिकांत चव्हाण, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, कायम निमंत्रित सदस्य संतोष राणे उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, आभार कार्यक्रमाविषयी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुडाळ एमआयडीसी साठी पॅकेजची घोषणा केली होती त्या अनुषंगाने या एमआयडीसीच्या विकासासाठी आपल्या काही कल्पना असतील तर सांगाव्यात असे सुचित केले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी सांगितले की पुढे एमआयडीसीमध्ये विद्युत पुरवठ्याची कमतरता आहे. त्यामुळे मोठे गुंतवणूक असणारे 45 उद्योजक गुंतवणुकीची तयारी सुद्धा विद्युत पुरवठ्यामुळे प्रकल्प उभारू शकत नाही या ठिकाणी उपकेंद्राची आवश्यकता आहे तसेच कौशल्य विकास केंद्र या ठिकाणच्या उद्योजकांसाठी सामायिक केंद्र आणि एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर होण्याची गरज आहे. ठिकठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे तसेच भुयारी विद्युत वाहिनी करण्याची आवश्यकता आहे एमआयडीसी असोसिएशनच्या या मागण्या ऐकून घेतल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी सांगितले की हा एमआयडीसी परिसर विकसित होण्यासाठी महत्त्वाचे काम पॅकेज मध्ये दिले पाहिजे मग त्यासाठी कितीही निधी लागला तरी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करू शकतो प्रामुख्याने विद्युत पुरवठ्याची जी गरज आहे त्यासाठी उपकेंद्र उभारणे हे महत्त्वाचे आहे तसेच भुयारी विद्युत वाहिनी करणे हे महत्त्वाचं आहे या बजेटमध्ये ही दोन महत्त्वाची कामे घेऊन आपण उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याजवळ प्रयत्न करू नक्की ते निधी देतील असे सांगितले तसेच त्यांनी उपअभियंता अविनाश रेवंडकर यांना या प्रस्तावासंदर्भात सूचना दिल्या आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करा असे सांगितले ही एमआयडीसी विकसित करण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कचरा प्रकल्प करावा लागेल
कुडाळ एमआयडीसी मध्ये नगरपंचायतीने कचरा प्रकल्पासाठी जागा घेतली आहे आपल्या असोसिएशनने त्याला ना हरकत दिली आहे त्यामुळे हा प्रकल्प निश्चित मार्गी लागणार आहे या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही किंवा आजूबाजूच्या व्यावसायिकांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत वेंगुर्ले नगर परिषदेच्या कचरा प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प उभा केला जाणार आहे याला सुद्धा सर्वांची साथ आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
