Monday, July 27, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकण२२ वर्षीय युवती बेपत्ता ; तळेबाजार येथील घटना

२२ वर्षीय युवती बेपत्ता ; तळेबाजार येथील घटना

तळेबाजार येथील साई कॉलनी येथे वास्तव्यास असणारी रुपा विलास पांढरे (वय २२ वर्षे) ही ३१ मेपासून बेपत्ता असल्याची फिर्याद रानू पांगरू पांढरे (रा. तळेबाजार, साई कॉलनी) यांनी सोमवारी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपा पांढरे ही ३१ मे रोजी मध्यरात्री १ वा. च्या सुमारास घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. तिचा नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. महाडिक करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!