Tuesday, July 28, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ“ सुरंगी रोपवन लागवड शुभारंभ” वनविभागाचे सावंतवाडीचे उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या...

“ सुरंगी रोपवन लागवड शुभारंभ” वनविभागाचे सावंतवाडीचे उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या हस्ते संपन्न…

कुडाळ | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुडाळ वनपरिक्षेत्रातील मठ वनपरिमंडळाच्या वन कक्षेमध्ये“ सुरंगी रोपवन लागवड शुभारंभ” वनविभागाचे सावंतवाडीचे उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या हस्ते झाला.

जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यावर लक्ष केंद्रित करून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिवस जगभरात साजरा होत आहे. पर्यावरणीय कृती, शाश्वत उत्पादन आणि वापर, समुद्र आणि महासागरांचे संरक्षण आणि परिसंस्था दुरुस्त करणे आणि जैवविविधता टिकवून ठेवणे यासह शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्तता करणे हे एक महत्त्वाचे योगदान आहे. या शुभारंभावेळी मठ ग्रामपंचायत सरपंच रुपाली नाईक, वेंगुर्ला डॉक्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या प्राध्यापक धनश्री पाटील, सावंतवाडी सहायक वनसंरक्षक सुनील लाड, कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सुर्यकांत सावंत तसेच सर्व वनपाल, वनरक्षक व वनमजूर कर्मचारी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!