राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम के गावडे यांनी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला…
*वेंगुर्ले: 6जून(वार्ताहर)*
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ५ जून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कारखाना येथे राष्ट्रवादीचे नेते तथा प्रदेश सरचिटणीस एम. के. गावडे यांच्या हस्ते कल्पवृक्षाचे झाड लावण्यात आले.
यावेकी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, जिल्हा सचिव सुशील चमणकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, संदीप राणे, केदार खोत, विलास पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष एन. डी. सावंत, मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालंडकर, देवगड तालुकाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्यासाहित विविध मान्यवर उपस्थित होते.
