*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची घेतली दखल*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी धडक देत कंत्राटी कमर्चाऱ्यांच्या पगाराच्या पैशात केला जाणारा भ्रष्टचार उघडकीस आणला होता. त्याचबरोबर २० जून पर्यंत आयुक्तांसोबत बैठक लावा अन्यथा २१ जून रोजी ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनंत डवंगे यांना दिला होता याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबईचे सहसंचालक हे ०९ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन आढावा घेणार आहेत. याबाबतचे परिपत्रक अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी काढले आहे. सर्व अध्यापक, वैद्यकीय अधिकारी,प्रशासकीय अधिकारी (महाविद्यालय व रुग्णालय) निवासी डॉक्टर, नियमित व कंत्राटी कमर्चारी यांनी ०९ जून रोजी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे. अनधिकृत पणे गैरहजर राहिल्यास शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेश अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
