राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन वृक्ष लागवडी ने साजरा …

 राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज तळेरे येथील ज्ञानवर्धिनी नर्सिंग कॉलेजमध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. या मध्ये नारळ, पोफळी तसेच ऑक्सटर या झाडांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा युवक अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक, कणकवली विधानसभा अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर, जिल्हा चिटणीस सुधाकर करले, सुनील हरमलकर, गौरव सडेकर, आनंद घाडी, रिया ठुकरूल, संस्थेचे पदाधिकारी डॉ निशा 

मालंडकर ,शर्मिला सावंत सात्विक मालंडकर, डॉ श्रुती मालंडकर , नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य जयेश मोचेमाडकर , शिक्षिका रोशनी पाडवे शिक्षकेतर कर्मचारी तसेच नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होते. समाजामध्ये अनेक वेळा रक्तदान शिबीर आयोजित केली जातात त्याच प्रमाणे अवयव दानाचे महत्त्व सातारा लायन्स क्लब चे महावीर साळवी यांनी उपस्थित जनसमुदायाला विशद केले. या सप्ताहामध्ये वृद्याश्रमाला धान्य वाटप , भाजी तसेच मच्छी विक्री करणाऱ्यांना छत्री वाटप, शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप, रुग्णांना फळ वाटप असे विविध कार्यक्रम मतदारसंघ निहाय आयोजित केलेले आहेत. यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला मतदार संघाची जबाबदारी माजी जि प सदस्य मकरंद परब व अर्शद बेग तसेच कुडाळ मालवण ची जबाबदारी बाळा सातारडेकर ,प्रकाश राजापूरकर व साईनाथ डिचोलकर याना देण्यात आली आहे. राष्ट्रवादी सप्ताह हा समाजोपयोगी भरगच्च कार्यक्रमांनी संपूर्ण जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे.