कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळमध्ये आज पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. पुरूषांच्या वटपौर्णिमेच यंदाचे १६ वे वर्षे आहे. कुडाळधील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेली अनेक वर्ष अविरतपणे चालू आहे. कुडाळ मधील श्री गवळदेव येथे पुरुषांनी वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून सुत गुंडाळले व आपल्या पत्नीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी भावना यावेळी पुरूष मंडळींनी व्यक्त केली. यावेळी उमेश गाळवणकर, प्रा. अरूण मर्गज, राजू कलिंगण, परेश धावडे, प्रसाद कानडे, सुरेश वरक, बळीराम जांभळे, अजय भाईप, ज्ञानेश्वर तेली, सुनील गोसावी, महादेव परब, ओकार कदम, नितीन बांबर्डेकर आदी उपस्थित होते.
