*वटपौर्णिमा या निमित्ताने कुडाळ नगरपंचायतीने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे रोपण करून पर्यावरण जतन करण्याचा संदेश..*

0

 

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाचे रोपण करून पर्यावरण जतन करण्याचा संदेश या माध्यमातून दिला आहे वडाच्या वृक्षाचे रोपण नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केल्यानंतर कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत आज (मंगळवार) वटपौर्णिमा या निमित्ताने कुडाळ नगरपंचायतीने पावशी येथील असलेल्या नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या जवळ वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, मुख्याधिकारी अरविंद नातू, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका सौ नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, पाणीपुरवठा अधिकारी रसिका नाडकर्णी, लिपिक संजय हेरेकर, सिद्धेश ठाकूर आदी नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.