*पोलीस अधिकारी अंमलदरांचा केला गौरव*
*ओरोस,19,जून*
कोकणपरिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, श्री. संजय दराडे यांनी आज गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांची गुन्हे आढावा बैठक घेऊन जिल्हा पोलिस दलाचे कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी गुन्हे निर्गती वेळेत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गंभीर गुन्ह्याचे तपासाबाबत मार्गदर्शन केले आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा देखील आढावा घेतला.
गुन्हे बैठकीदरम्यान गुन्हे तपास व गुन्हे शाबीती करीता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव केला आणि त्यांना चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील अभ्यागतांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि सदर तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ योग्य ती कारवाई करणेबाबत संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या
तसेच कणकवली पोलीस ठाणे येथे कणकवली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या त्यानी जाणून घेतल्या आणि पोलिस हे सदैव आपल्या मदतीसाठी आणि रक्षणासाठी हजर असतील याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कृषीकेस रावले तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते


