कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भैरववाडी, तूपटवाडी या ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व भैरववाडी सुमारे येथील १० कुटुंब स्थलांतरित करण्यात आली. दरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामध्ये अनेक गावांमध्ये पडझड झाली आहे. कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर भैरववाडी या ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे भैरववाडी येथील गुलमोहर हॉटेल जवळ असलेला महामार्गाला जोडणारा रस्ता पूरस्थितीमुळे बंद झाला आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आलेल्या पाण्यामुळे रेल्वे स्थानक तसेच बांव कडे जाणारा रस्ता बंद झाला होता दरम्यान डॉ. आंबेडकर नगर मधील या पुराचा अंदाज घेऊन सुमारे ५ कुटुंबीयांनी स्थलांतर केले तसेच भैरववाडी येथे पंचायत समितीच्या मागे असणाऱ्या कुटुंबाने सुद्धा स्थलांतर केले.


