Friday, December 5, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीआम. निलेश राणे यांच्या नवलाईची हुशारीची विधिमंडळ परिसरात जोरदार चर्चा...

आम. निलेश राणे यांच्या नवलाईची हुशारीची विधिमंडळ परिसरात जोरदार चर्चा…

मुंबई, १० जुलै (प्रतिनिधी)

कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या नवलाईची आणि हुशारीची चर्चा सध्या विधिमंडळ परिसरात ऐकायला मिळत आहे. पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असल्याने राणे यांनी आपल्या मतदार संघातील अभ्यासू पद्धतीने मांडलेले विषय पहाता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही वर्षात घडलेल्या घटना पहाता एक राजकारणी म्हणून निलेश राणे त्यांच्याकडे वेगळेपणाने पाहिले जात होते पण त्यांचे विधानसभेतील अभ्यासू आणि प्रभावी कामकाज पाहून अनेकांचा कुतुहुलाचा विषय ठरल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

आम. निलेश राणे हे माजी खासदार आहेत, तसेच संसदेच्या कामाचा मोठा अनुभव आहे. आता त्यांना कुडाळ मतदार संघातून विधान सभेत नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने त्याचा ते पुरेपूर फायदा उठवीत असल्याचे पहायला मिळते. राणे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असून सुद्धा कोणताही आडपडदा न ठेवता, स्वतः ची मते न लपविता स्पष्ट शब्दात वस्तुनिष्ठ मांडणी करणारा आणि न विचकणारा आमदार अशी त्यांची ओळख होऊ लागल्याने ऐकायला मिळते.

विशेष म्हणजे आमदार, प्रसार माध्यम आणि सरकारी कर्मचारी लोकांमध्ये निलेश राणे यांच्या कामकाजाची चर्चा आहे. आम. निलेश राणे यांनी मेडिकल कॉलेज, नगरपंचायत व नगरपालिका मिळणारा अपुरा निधी, सीआरझेडमध्ये शिथिलता हवी, पर्यटनामध्ये मोठी गुंतवणूक करायला हवी, आरोग्य, शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. बांबू लागवडमधील त्रुटी असे अनेक विषय त्यांनी गेल्या दोन तीन अधिवेशनात मांडले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!