कुडाळ | प्रतिनिधी
मांडकुली येथील ४८ वर्षीय प्रदन्या प्रमोद पेडणेकर या महिलेने घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिची मानसिक स्थिती बिघडल्याने ही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे याबाबत तिचे पती प्रमोद पेडणेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मांडकुली प्रदन्या प्रमोद पेडणेकर मागील ३ वर्षांपासून मनोरुग्ण होत्या. त्यांच्यावर उपचार चालू होता. पती प्रमोद श्रीधर पेडणेकर कामानिमित्त कुडाळ एमआयडीसी येथे गेले होते. प्रमोद पेडणेकर दुपारी १.१५ च्या सुमारास घरी आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. पाठीमागील दरवाजा देखील बंद असल्याने पती यांनी समोरील दरवाजा तोडला. प्रदन्या यांनी घरच्या माळी वर छताच्या वाश्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. यांच्या पाश्चात्य पती, मुलगा प्रणव, मुलगी प्रिया असे कुटुंब आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.


