मुंबई | प्रतिनिधी
चालू पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी आज (मंगळवार) कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली असून योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
याप्रसंगी ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर, गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम, आमदार व माजी मंत्री श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. महेंद्र दळवी, श्री. शेखर निकम, श्री. प्रशांत ठाकूर, श्री. रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.


