देवगड | प्रतिनिधी
देवगड जामसंडे नगरपंचायत स्विकृत नगरसेवकपदी भाजपाचे चंद्रकांत कावले बिनविरोध निवडून आले.यावेळी भाजपा वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जेष्ठ पदाधिकारी बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष योगेश पाटकर,दया पाटील,गटनेते शरद ठुकरुल,सर्व नगरसेवक-नगरसेविका,राजा वालकर, चंद्रकांत पाटकर, व्हि.सी.खडपकर, बापू जुवाटकर, वैभव करंगुटकर , चंद्रकांत पाटकर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .
चंद्रकांत कावले हे जामसंडे क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ते आणि समाजसेवक असून पक्षाने त्यांचा सन्मान केला या निवडीबद्दल कावले यांनी भाजप पक्ष,खासदार नारायण राणे,प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जेष्ठ नेते अजित गोगटे, बाळ खडपे, संदिप साटम यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.


