कुडाळ | प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतूक करताना सापडलेल्या डंपर चालकांनी महसूलच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन त्यांच्यावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या चालक व मालक असलेल्या मालवण चौक येथील निखिल नितीन परब याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली तर चालक आप्पासाहेब मदने याची जामीनावर मुक्तता झाली.
सध्या अवैध वाळू उत्खनन व वाहतूक हिला रोखण्यासाठी महसूल विभाग कामाला लागला आहे या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी पथके निर्माण केले आहेत आणि ही पथके सर्वत्र फिरत आहेत ही पथके फिरत असताना नेरूर नाका येथे महसूलच्या पथकाने दोन डम्परांना थांबण्याचा इशारा केला मात्र या डंपर चालकांनी डंपर महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तसेच पकडलेली वाळू त्याच ठिकाणी ओतले या प्रकरणी मालवण चौक येथील निखिल नितीन परब व आप्पासाहेब मदने याला ताब्यात घेण्यात आले होते या दोघांनाही न्यायालयात जर केले असता मालक व चालक असलेला निखिल परब याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर चालक आप्पासाहेब मदने याची जामिनावर मुक्तता करण्यात आली


