Tuesday, July 14, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीसिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांसाठी आरोग्य शिबिर — ८ ते १० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात...

सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांसाठी आरोग्य शिबिर — ८ ते १० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तपासणी मोहीम

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांसाठी ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार असून, कलाकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

 

शिबिराचे वेळापत्रक

  • 🔷वेळ: सकाळी १० ते २ दुपारी 
  • 🔷८ सप्टेंबर — सावंतवाडी जिल्हा रुग्णालय : दोडामार्ग, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यातील दशावतार कलाकारांची तपासणी.
  • 🔷९ सप्टेंबर — कुडाळ महिला रुग्णालय : मालवण आणि कुडाळ तालुक्यातील कलाकारांची तपासणी.
  • 🔷१० सप्टेंबर — कणकवली जिल्हा रुग्णालय : वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यातील कलाकारांची तपासणी.

या शिबिरात सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी केली जाणार असून, तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहतील. तसेच, नवीन आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड ID तयार करण्याची सुविधाही उपलब्ध असेल.

कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक (आधार कार्डशी संलग्न)
  • रेशन कार्ड

कलाकारांनी नियोजित दिवशी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

संपर्क :९४०४७४९०८६,९४०४४४५०१८

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!