कुडाळ | प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्ष, ५० वी कै. अॅड. अभय देसाई स्मृति सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा नवरात्र उत्सवामध्ये आयोजित केली आहे.
सन २०२५ मध्ये या भजन स्पर्धेचे ५० वे वर्ष असल्याने भव्य अशी भजन स्पर्धा आयोजित करीत असल्याने भजन स्पर्धेकरीत बक्षीसेही भरघोस ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक ५० हजार रुपये, व्दितीय क्रमांक ३० हजार रुपये, तृतीय क्रमांक २० हजार रुपये, चतुर्थ क्रमांक १० हजार रुपये, पाचवा क्रमांक ५ हजार रुपये याशिवाय उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाजवादक, उत्कृष्ट हार्मोनियमवादक, उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट झांजवादक यांना वैयक्तिक रोख बक्षीसे, भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच या भजन स्पर्धेमध्ये भाग घेण्याऱ्या प्रत्येक मंडळाला रुपये १ हजार रुपये मानधन व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. सदरील भजन स्पर्धा हो सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच संघांना प्रवेश देण्यात येईल.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित भजन स्पर्धेचे ५० वे वर्ष असल्याने सदरील भजन स्पर्धा ही दोन टप्प्यात घेणार आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ ते बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १० दिवस दररोज संध्याकाळी ६ ते रात्रौ १२ वा. पर्यंत ५ भजने सादर होतील. या दहा दिवसामधून अंतिम फेरीसाठी एकूण १२ मंडळे निवडण्यात येतील. या १२ मंडळांची अंतिम फेरी गुरुवार दि. २ ऑक्टोबर ते रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ४ दिवस प्रत्येक दिवशी तीन भजने सादर करणेत येतील.
सदरील भजन स्पर्धेचे प्रवेश अर्ज गुरुवार दि. ११ सप्टेंबर ते शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ पर्यंत श्री. महेश कुडाळकर मोबा नं. ९४२०२१००२०/९१५६९६७८९० श्री कुडाळेश्वर मंदिर येथे स्विकारले जातील. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन मंडळांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ ने आवाहन केले आहे.


