Saturday, November 8, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडी*अधिकारी कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण जिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

*अधिकारी कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण जिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

ओरोस,14आँक्टो

कार्यालयात अनधिकृतपणे घुसून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या इसमावर प्रतिबंधात्म ।क कारवाई होणेबाबत व्हावी अशीमागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे अशा प्रवृत्तीच्या संबंधितावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे

 

    महाशय,

           गेले काही दिवस अनेक कार्यालयात जाऊन अनधिकृतपणे अर्वांच्य भाषेत अपमानीत करणे, खोटे आरोप करणे अशा प्रकारचे वर्तन जीवन कुडाळकर नामक इसम करीत असून कर्मचाऱ्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    शुक्रवार दि. १० ऑक्टोबर२०२५ रोजी मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयप्रकाश परब यांचे दालनात जाऊन त्याने त्यांच्याशी अशाच प्रकारचे वर्तन केले आहे.अशाच प्रकारे वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन येथेही प्रकार घडलेला आहे.

     त्यांना एखाद्या गोष्टी बद्दल आक्षेप असेल तर वरिष्ठ अधिकारी यांचेकडे रितसर तक्रार करावी. ते दोषी असतील तर वरिष्ठ कारवाई करतील. कायदा हातात घेण्याचा यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो.

    त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम २२१ नुसार कारवाई करण्यात यावी. तसेच सदरच्या इसमाचे वर्तन हे सार्वजनिक कर्तव्य बजावताना सार्वजनिक सेवक म्हणून कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याच्या किंवा रोखण्याच्या हेतूने सार्वजनिक काम करण्यास अडथळा निर्माण करणारे असल्याने भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १३२ नुसार भविष्यातील गुन्ह्याला खतपाणी घालणारे आहे. त्यावर योग्य ती कारवाई व्हावी. अशी संघटनेची मागणी आहे. तसे न झाल्यास नाविलाजास्तव राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती सिंधुदुर्गच्या* झेंडया खाली जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन कामबंद आंदोलन करतील. 

 

तरी उचित कारवाई व्हावी.

 

न्यायाच्या प्रतीक्षेत.

जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर

जिल्हा सरचिटणीस सत्यवान माळवे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!