Saturday, November 8, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीजिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये स्वीकृत सदस्य वाढवा !

जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये स्वीकृत सदस्य वाढवा !

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी 

 

मुंबई, दि.14 :जिल्हा परिषदेमध्ये पाच व पंचायत समितीमध्ये दोन सदस्य नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य म्हणून नेमण्यासाठी ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात’ सुधारणा करावी, अशी पत्राद्वारे मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला ते पत्र पाठविले.

बावनकुळे पत्रात म्हणतात, ग्रामीण स्तरावर सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकत्यांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळावी या दृष्टिकोनातून, विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या अधिनियमातील तरतुदींनुसार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येते. परंतु सध्याच्या धोरणानुसार या संधी मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे, राज्य शासनाने अधिनियमानुसार सुधारणा करून जिल्हा परिषदेसाठी पाच व पंचायत समितीसाठी दोन स्वीकृत सदस्य नेमण्याची तरतूद करावी. यामुळे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या, परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी व सर्वसमावेशक होईल. आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुधारणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.”

लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत असल्याने या मागणीला विशेष महत्त्व आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!