Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीवेळागर येथील भूमिपुत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष ताजप्रकल्पाच्या कराराला विरोध जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष..

वेळागर येथील भूमिपुत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष ताजप्रकल्पाच्या कराराला विरोध जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष..

सिंधुदुर्गनगरी, 26डीसे

शिरोडा वेळागरवाडी, येथील पर्यटन विकासाकरिता शासनाकडे उपलब्ध असलेल्या विस्तीर्ण संपादित क्षेत्रातून केवळ सु. ०९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची असलेली स्थानीक शेतकऱ्यांची मागणी बाबत माजी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ततेसंबंधीची कार्यवाही होऊन दिलासा देणेबाबत

पर्यटनमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यमुंबई मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ला) येथील ताज प्रकल्पासाठी त्रिसदस्यीय करारपत्रावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. यातील वृत्तांतानुसार स्थानिक भूमिपुत्रांना डावलून व पूर्णपणे अंधारात ठेवून हे करारपत्र करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

आम्ही गेली कित्येक वर्षे एकूण सुमारे ४१.६३-२० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ तु. ९. हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी शात्तनाकडे करीत असून त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू ठेवलेला आहे. या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह आहे, माड बागायत आहे, दुबार पीक येणारी शेतजमीन आहे, काजूची झाडे आहेत, तसेच राहती घरे, मांगर, शौचालये, विहीरी, धार्मिक स्थळे आहेत. म्हणूनच आम्ही सदरचे केवळ सु. ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी सुरुवातीपासून केलेली होती व ती आजही आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, या क्षेत्राखेरीज आम्हा शेतकन्यांकडे अन्यत्र कुठेही कोणतीही जमीन व उदरनिर्वाहाचे अन्य कोणतेही साधन नाही.

सर्व संबंधित मंत्री सचिव, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पर्यटन विभाग यांचेकडे याबाबतची सविस्तर निवेदने वारंवार देऊन मागणी लावून धरली आहे. तसेच न्याय मिळण्यासाठी खाडीपात्रातील पाण्यातउतरुन जलजांदोलन, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, आझाद मैदान मुंबई येथे उपोषण अशा माध्यमातून न्याय मिळण्यासाठी कळकळीचे प्रयत्न केले. तसेच दि. ०३/१०/२०२४ रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) सावतबाडी येथे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आम.राजन तेली, म.प.वि.म.चे कार्यकारी गंचालक, ताजग्रुपचे कार्यकारी संचालक यांचेशी VC द्वारे आयोजित केलेल्या सभेत आमच्यासंघटनेमार्फत अध्यक्ष, सचिव, सल्लागार, व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून आमची मागणी मांडला होती. परंतु प्रत्येक वेळी आम्हाला पोकळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रत्यक्षात मात्र आजमितीपर्यंत कोणताही दिलासा दिलेला नाही.

शिरोडा ग्रामपंचायतीच्या वि. २५/५/२०२४ रोजी झालेल्या ग्रामसमेत या विषयावर चर्चा होऊन जोपर्यंत आम्ही मागणी केलेले सु. ९ हे. क्षेत्र बगळण्यात येणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रकारच्या कामासाठी (development) कोणतीही ना-हरकत देण्यात येऊ नये असा ठराव एकमताने संमत करण्यात आलेला आहे. तरी गावातील नागरीकांचे मत व भूमिका याची दखल घेण्यात येऊन त्याचा सन्मान राखला जावा अशी विनंती आहे.दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन पर्यटनमंत्री गिरीश महाजन, स्थानिक आम.दीपक केसरकर वगैरे यांनी शिरोडा वेळागर भागात भेट दिली होती. त्यावेळी तत्कालीन पर्यटनमंत्री श्री गिरीश महाजन यांनी वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात आले असताना आम्हा शेतकऱ्यांना उपरोक्त विषयांकीत सु. ९ हे. क्षेत्र वगळण्याबाबत ठोस असे आश्वासन दिलेले होते. मात्र त्याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

 सु. ९ है. क्षेत्र वगळण्याबाबत कार्यवाही करुन आम्हाला दिलात्ता द्यावा, व तोपर्यंत वेळागर येथील एकूण पर्यटन क्षेत्रात कोणतेही काम सुरु करण्यात येऊ नये किंवा तशी परवानगी कोणत्याही कंपनीस देण्यात येऊ नये तरी आपले स्तरावरुन याबाबत योग्य ती सकारात्मक कार्यवाही व्हावी, तसेच आवश्यक त्या सर्व सबंधित वरिष्ठ कार्यालयांकडे आमचे म्हणणे, कळकळ व तळमळ आपले शिफारशीसह पोहोचवून,आमच्या या निवेदनाचा अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करुन आम्हाला न्याय द्यावा अशी कळकळीची नम्र विनंती आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात माजी आमदार राजन तेली यांच्यासह वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्षराजेंद्र जगन्नाथ आंदुर्लेकर सचिवहनुमंत केशव गवंडी जयप्रकाश चमणकर महादेव (भाऊ) बाबू आंदुर्लेकर आदीनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!