ओरोस, 26डीसे
क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत डॉन बॉस्को हायस्कुल जुनिअर कॉलेज, ओरोस च्या कुमारी दिव्या दिलीप राणे हिने १४ वयोगट मुली या क्रीडा प्रकारात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेत राज्यातील ८ विभागातील ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तिच्या या यशात तिचे वडील तथा जिल्ह्यातील नामांकित राज्यस्तरीय कॅरमपट्टू श्री. दिलीप राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाने डॉन बॉस्को हायस्कूल जुनिअर कॉलेज, ओरोस प्रशालेच्या नावलोकिकातअजून एक मानाचा तुरा रोवला.
कठोर परिश्रम, शिस्त, समर्पण आणि चिकाटीने मिळवलेल्या या यशामुळे जिल्हावासियांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तिच्या या नेत्रदीपक कामगिरी मुळे प्रशाळेचे मुख्याध्यापक फादर मेल्वीन फेराव, उप मुख्याध्यापक फादर रोनाल्ड, संस्थेचे रेक्टर फादर पॉल डिसोझा, व्यवस्थापक फादर फ्रँसिस झेवीअर, क्रीडाशिक्षक बाळकृष्ण कदम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व जिल्हावासियांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.


