Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळतेंडोली जि.प. गटात गोवेरी मध्ये उबाठा सेनेला खिंडार.. राजेंद्र उर्फ राजू राऊळ...

तेंडोली जि.प. गटात गोवेरी मध्ये उबाठा सेनेला खिंडार.. राजेंद्र उर्फ राजू राऊळ यांच्यासह ग्रामस्थांचा भाजपा मध्ये प्रवेश..

गोवेरी येथील उबाठा सेनेचे पदाधिकारी श्री. राजेंद्र उर्फ राजू राऊळ यांनी तसेच सुदाम गोलम, राजेश गोलम, कुणाल लिंगवे, भाई लिंगवे, उमेश राऊळ, प्रवीण गावडे, हरिश्चंद्र गावडे, संजय गावडे, सुरेखा राऊळ, प्रतीक्षा राऊळ, अंकिता गावडे, सोनाली गावडे, सरिता गोलम, प्रिया गावडे, सुप्रिया गावडे,, चंद्रकला गावडे, शंकर गोलम, भाई लिंगवे, अभय माधव, माधवी माधव, मयुरी गावडे तसेच इतर सुमारे 80 ग्रामस्थासहित जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई, भाजपा नेते राजु राऊळ, मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला 

  यावेळी महायुतीच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ. आरती पाटील, पंचायत समिती उमेदवार श्री. मंगेश प्रभू, SC सेल अध्यक्ष श्री. विष्णू तेंडोलकर गोवेरी माजी सरपंच श्री. भरत गावडे, दिगंबर गोवेरकर, जेष्ठ भाजपा नेते श्री. बाळा माधव, श्री. बाबू गावडे, सतिश गावडे, आंदुर्ले उपसरपंच अनिल भगत,तेंडोली ग्रा. प. सदस्य श्री. बाळू पारकर, भगवान गावडे, भूपेंद्र गावडे, शशिकांत आरोलकर, गोट्या मेस्त्री व इतर मान्यवर उपस्थित होते.

  पक्ष प्रवेश केल्यावर श्री. राजेंद्र राऊळ यांना भाजपा कुडाळ मंडल उपाध्यक्षपदी नेमणूक जाहीर करण्यात आली, तर माजी सरपंच श्री. भरत गावडे यांची जिल्हा कार्यकरणीवर निवड घोषित करण्यात आली. यावेळी गोवेरी गावातून दोन्ही उमेदवारांना मोठे लीड मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!