Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीआम. निलेश राणे यांच्याकडून पवार कुटुंबियांचे सांत्वन..

आम. निलेश राणे यांच्याकडून पवार कुटुंबियांचे सांत्वन..

*कुडाळ,30*

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, सन्माननीय नारायणरावजी राणे साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार परिवार यांचे नाते हे राजकारणापलीकडचे, आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे होते—जे शब्दांत मांडणे अशक्य आहे.

स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, आज कोकणचे सुपुत्र आणि आमदार श्री. निलेशजी राणे यांनी अजित दादा पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.

स्व. अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते, तर दिवसरात्र जनतेसाठी झटणारे, कामातून आपली ओळख निर्माण करणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांसह आम्हा सर्वांसाठी निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. 

या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी निलेश राणे साहेबांनी पवार कुटुंबीयांना धीर दिला.

ईश्वर स्व. अजितदादांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!