Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा मध्ये बदल...

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा मध्ये बदल…

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय 

 

मुंबई | प्रतिनिधी 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने बुधावारी शासकीय सुट्टी जाहीर केली होती. शिवाय तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे निवडणुकांचं कामकाज आणि प्रचाराला वेळ मिळावा, यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आलेल्या आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी होणारी मतदानाची प्रक्रिया आता ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी पार पडेल. एवढा बदल निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेला आहे.

राज्यामध्ये १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. बुधवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. पूर्वी प्रचारासाठी सात दिवसांचा वेळ मिळणार होता, परंतु दुर्दैवी घटनेमुळे आणि शासकीय दुखवट्यामुळे तो वेळ चार दिवसांचा मिळाला असता. त्यामुळे दोन दिवस निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!