Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीमालवण येथील मच्छीमार व पर्यटन पूरक व्यावसायिकांना सीआरझेड चे उल्लंघन केल्याप्रकरणी बजावण्यात...

मालवण येथील मच्छीमार व पर्यटन पूरक व्यावसायिकांना सीआरझेड चे उल्लंघन केल्याप्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिसांन उत्तर देण्यात आले असून, मच्छीमार्‍यांवर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही – आमदार निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी 

मालवण येथील मच्छीमार व पर्यटन पूरक व्यावसायिकांना सीआरझेड चे उल्लंघन केल्याप्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिसांना उत्तर देण्यात आले आहे या मच्छीमार्‍यांवर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी कुडाळ येथे सांगितले.

सी आर झेड चे उल्लंघन केल्याप्रकरणी मालवण येथील 40 मच्छीमार व पर्यटन पूरक व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आले आहे या संदर्भात आज सोमवारी कुडाळ येथील प्राण कार्यालय येथे नोटीसा बजावण्यात आलेल्या नागरिकांना बोलवण्यात आले होते यावेळी आमदार निलेश राणे उपस्थित होते तसेच प्रांताधिकारी ऐश्वर्य काळुसे तहसीलदार सचिन पाटील जिल्हाप्रमुख दत्ता सामंत मच्छीमार व्यवसायिक यांचे प्रतिनिधी विकी पुरस्कार चारुशीला आचरेकर, मालवण नगर परिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर नगरसेवक महेश कोयंडे तसेच व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की मालवण येथे एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून एनजीटी मार्फत सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 40 नागरिकांना नोटीसा बजावण्यात आले आहे या ठिकाणी गोरगरीब असलेल्या या मच्छीमारांना देण्यात आलेल्या नोटिसा या तांत्रिकदृष्ट्या कशा सोडवल्या जातील याकडे आमचा पूर्णपणे लक्ष असेल या नोटिसांना उत्तर देण्यात आले आहे ज्यांचे वाद आहेत त्यांच्याशी बोलण्यात येईल एकाच्या तक्रारीवरून सर्वांना नोटिसा देणे चुकीचे आहे तरी यामध्ये आम्ही लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावू मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाली आहे या प्रश्नावर लवकरच मार्ग काढला जाईल आणि मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!